Reg No. 103,    |     RBI Licence No- UBD/MAH/1133/P    |    PAN No- AAAAY1623N   |     GST No- 27AAAAY1623N1Z    |    IFSC Code- HDFC0CYCBLY

यड्राव को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यड्राव

प्लॉट नं. १०२, पार्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट, शामराव पाटील यड्रावकर नगर,

यड्राव, ता.-शिरोळ, जि.- कोल्हापूर- ४१६१४५

ठेव पॉलिसी


प्रस्तावना:

बँकिंग व्यवसायात ठेव संकलन हा एक आवश्यक घटक असून, व्यवसायवृद्धीसाठी त्यास अनन्यसाधारण महत्व आहे. बँकिंगच्या मूळ संकल्पनेनुसार ग्राहकाकडून ठेव संकलित करून त्याचा विविध प्रकारची कर्जे वितरणासाठी विनियोग करणे आणि त्या माध्यमातून नफा कमविणे हा मूळ उद्देश आहे. बँकांनी त्यांचे व्यवसाय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रतीवर्षी निश्चित धोरण ठरवणे अपेक्षित आहे. त्यासाठी कार्यपद्धतीत नेमकेपणा आणि ठराविक साचेबद्धता असणे आवश्यक आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना ठेवीवरील व्याजदर ठरविणेबाबत स्वायतत्ता दिली आहे. बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करणेसाठी अधिकाधिक सेवा पुरविताना अन्य बँकांबरोबर स्पर्धात्मक व्यवसाय आकारीत, बँकेमधील ठेवी व कर्जे यांचा समतोल राखून नफा कमवीत असतात.

बँक ठेविवरील व्याज दर निश्चित करत असताना ठेव कालावधी निहाय तसेच ठेव प्रकार व ठेव योजना निहाय सर्व साधारण ठेवीदार, सहकारी संस्था, ज्येष्ठ नागरिक (वयोमर्यादा ६० वर्षे पूर्ण), सेवकवर्ग, तसेच रक्कम रु. १५ लाख व त्यावरील मोठ्या रकमेच्या (बल्क) ठेवी इत्यादी निकष विचारात घेत असते.

RBI Circular No. / DCBR / 2015-16/23 Master Direction DCBR. No. 1/13.01.000/2015-16, dated May 12, 2016  नुसार काही बाबी नव्याने सदर पॉलिसी मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.त्या पुढील प्रमाणे:-

१) चालू ठेव खाते वगळता अन्य सर्व ठेवींवर व्याज देण्यात येते. (अपवाद- एकल खातेदाराच्या मृत्युनंतर त्याच्या वारसांनी चालू ठेव खात्यातील शिल्लक रकमेची मागणी केल्यास, मृत्यू झाल्यापासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा करणेपर्यंतच्या कालावधीचे व्याज हे बचत ठेव खात्यानुसार देण्यात येते.)

२) बँकेच्या सर्व  शाखांकरिता एकसारखाच व्याजदर असून त्यामध्ये कोणतीही भिन्नता ठेवण्यात आलेली नाही व ते आगाऊ जाहीर करण्यात आलेले आहेत. ठेवीदार व बँक यांचेमध्ये व्याजदरावरून कोणतीही तफावत केली जात नाही.

३) बँकामार्फत अदा करणेत येत असलेल्या व्याजाची रक्कम हि पैशामध्ये असल्यास, जवळच्या रुपयामध्ये रुपांतरीत करून अदा केली जाते.

४) जर ठेव पावतीची मुदत सुट्टीच्या दिवशी संपत असेल तर ठेव पावतीच्या व्याजदराने ग्राहकास सुट्टीच्या दिवसाचे व्याज अदा केले  जाईल.

५) रु. ३.०० लाखापर्यंत शिल्लक राखणाऱ्या सर्व बचत ठेव खातेदारांना एकसमान व्याजदर असून त्यावर शिल्लक राखणाऱ्या बचत ठेव खातेदारांना स्वतंत्र व्याजदर देण्यात येईल.

६) ठेवीचा व्याजदर हा रक्कम व कालावधी यांचेशी निगडीत ठेवण्यात आलेला असून केवळ contracted rate नुसार व्याज अदा  करण्यात येत नाही. तसेच किमान ७ दिवसांच्या आत ठेव मुदतपूर्व बंद केल्यास त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही.

७) बचत ठेव खात्यावर दर तिमाहीस व्याज दिले जाते. त्याचप्रमाणे फ्रिज केलेल्या अथवा ऑपरेटिंग नसलेल्या खात्यांना देखील सेव्हिंग ठेव व्याज दरानुसार व्याज अदा केले जाते.

८) ठेवी मुदत पूर्व बंद करणेचे वेळी आकारावयाच्या दंड व्याजाबाबतचा निर्णय बँकेने घ्यावयाचा आहे. त्यात बदल करण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत. मात्र सदरील पिनल इंटरेस्ट तसेच मुदत ठेवीवरील व्याजदराची माहिती बँकेने/ शाखेने ग्राहकांना करून देणे गरजचे आहे. पावतीच्या पाठीमागे मुदत पूर्व ठेव बंद करणेचे वेळी आकारावयाच्या दंडव्याजाबाबतचा उल्लेख करण्यात येईल.

९) व्यक्ती आणि Hindu Undivided Family यांच्या मोठ्या ठेवी (Bulk deposit) वगळून अन्य सर्व मोठ्या ठेवी (Bulk Deposit) या मुदतपूर्व बंद करून परत करण्यास बँक प्रतिबंध करू शकते. फक्त सदरील बाब ठेवी स्वीकारतानाच बँकेने स्पष्ट करणे गरजेचे आहे.

१०) ठेव पावतीचे नुतनीकरण करणेसाठी ग्राहकाने पावतीच्या मागे त्याबाबत स्पष्ट निर्देश देणे आवश्यक आहे. त्यामध्ये ग्राहकाने ठेव कालावधी नमूद करणे गरजेचे आहे. तसा कालावधी नमूद केलेला नसल्यास, मूळपावतीचा जो कालावधी असेल, त्याच कालावधीसाठी पावतीचे नुतनीकरण करण्यात यावे.

आजारी खातेदार किंवा दवाखान्यात ट्रीटमेंट सुरु असलेले खातेदार अथवा वृद्धापकाळामुळे बँकेत येऊन रक्कम काढणे शक्य नसलेले खातेदार, अशांसाठी सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे शाखेतील एक सेवक संबंधित खातेदाराकडे जाऊन विथड्रॉवल स्लीप / चेकच्या मागे सही घेऊन अथवा स्वतंत्रपणे त्यांचेकडून मेडिकल सर्टिफिकेट घेऊन खातेदाराच्या खात्यातून रक्कम काढून दिली जाते. सदरील व्यवहारचे वेळी बँकेतील बँकेतील एक जबाबदार सेवक/ अधिकारी तेथे प्रत्यक्ष हजार राहून परिस्थिती पाहून त्यानुसार कार्यवाही करीत असतो.

रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सर्क्युलर क्र. RBI/2015-16/5 DCBR.BPD.(PCB) MC. नो. 6/13.01.000/ 2015-16 दिनांक- १ जुलै, 2015 चे परिपत्रकामध्ये याबाबतच्या कार्यवाहीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सदरबाबतचा मूळ तपशील सोबत स्वतंत्रपणे जोडलेला आहे. त्यानुसार जे खातेदार आजारी असल्यामुळे सही करू शकत नाहीत. वार्धक्यामुळे बँकेत येवू शकत  नाहीत अथवा आजारपणामुळे हॉस्पिटल मध्ये भरती झालेले असतात, अशा खातेदारांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून शाखाकडे त्यांच्या खात्यातील रकमांबाबत मागणी केली जाते. त्यावेळी खातेदारांची सही घेताना, दोन साक्षीदार आवश्यक आहेत. त्यातील एक साक्षीदार हा बँकेतील जबाबदार बँक अधिकारी असावा. मात्र ज्यावेळी खातेदारास सही / अंगठा करणे शक्य होत नाही तसेच खातेदार बँकेतहि येऊ शकत नाही अशा वेळी बँकेतील जबाबदार अधिका-याने समक्ष खातेदाराकडे जाऊन त्याची एखादी खूण, विथड्रॉवल स्लीप / चेकवर घेणे आवश्यक आहे. सदरील खुण हि कोणत्याही प्रकारची घेतली तरी चालु शकणार आहे. मात्र त्यावेळीही खातेदाराकडून खुण घेताना दोन साक्षीदार आवश्यक आहेत. त्यातील एक साक्षीदार हा बँकेचा जबाबदार बँक अधिकारी असणे आवश्यक आहे.

याशिवाय ज्या ग्राहकानं दोन्ही हात नसल्यामुळे जे सही करू शकत नाहीत, अशा व्यक्तींची खाती उघडून घेणेबाबतचे मार्गदर्शन रिझर्व्ह बँकेने त्यांचे मास्टर सर्क्युलरमधील 5.8.4 मध्ये केलेले आहे. त्यानुसार अशा व्यक्तीने कोणत्याही प्रकारे केलेली खुण (उदा. पायाचा अंगठा अथवा टाचेची केलेली खुण अथवा शरीराच्या  कोणत्याही भागाच्या भागाच्या अवयवाची खुण ) हि सही समजण्यात यावी. मात्र अपंग व्यक्तीने कोणत्याही प्रकारे केलेली खुण अथवा निशाणी हि विथड्रॉवल स्लीपवर करणे आवश्यक व अनिवार्य आहे.

रिझर्व्ह बँकेनी त्यांचे मास्टर सर्क्युलरमध्ये नमूद केलेल्या 5.8.1 ते 5.8.4 या बाबी सन २०१९-२० च्या ठेव पॉलीसी मध्येहि अंतर्भूत करणेत येणार आहेत. सर्व शाखांमध्ये याबाबतच्या कामकाजामध्ये सुसूत्रता रहावी,यासाठी उपरोक्त सर्व बाबी शाखांना कळविणेत येत आहेत. तरी याबाबतची माहिती सर्व सेवकांना करून देण्यात येऊन रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसारच कामकाज केले जाईल, याबाबतची काळजी घ्यावी. (संदर्भ: रिझर्व्ह बँकेचे मास्टर सर्क्युलर क्र. RBI/2015-16/5 DCBR.BPD.(PCB) MC. नो. 6/13.01.000/ 2015-16 दिनांक- १ जुलै, 2015)

5.8.1. In order to facilitate old / sick / incapacitated bank customers to operate their bank account, procedure as laid down in Paragraph 5.8.2 bellow may be followed. The case of sick / old /incapacitated account holders fall into the following categories:-

(i) An account holder who is too ill to sign a cheque / cannot be  physically present in the bank to withdraw money from his bank account but can put his/her thumb impression on the cheque / withdrawal slip/form, and

(ii) An account holder who s not only unable to be physically present in the bank but is also not even put his / her thumb impression on the cheque / withdrawal slip/ form due to certain physical defect / incapacity.

5.8.2(i) Wherever thumb or toe impression of the sick / old / incapacitated account holder is obtained, it should be identified by two independent witnesses known to the bank, one of whom should be a responsible bank official.

5.8.2(ii) Where the customer cannot even put his / her thumb impression and also would not be able to be present in the bank, a mark obtained on the cheque / withdrawal slip/ form which should be identified by two independent witnesses , one of whom should be a responsible bank official.

5.8.3 In such cases the customer may be asked to indicate to the bank as to who would withdraw the amount from the bank on the basis of cheque / withdrawal form as obtained above and that person should be identified by two independent witnesses. The person who should actually drawing money from the bank should be asked to furnish his signature to the bank.

5.8.4 In this context, according to an opinion obtained by the IBA from their consultant on the question of opening a bank account of a person who had lost both  his hands and could not sign his cheques / withdrawal forms, there must be physical contact with the person who is to sign and signature or the mark put on the documents. Therefore in the case of a person who has lost both his hands, the signature can be by means of a mark. This mark can be placed by the person who is in any manner. It could be the toe impression, as suggested. It can be by means of mark which anybody can put on behalf of the person who has to sign, the mark being put by an instrument which has had a physical contact with the person who has to sign.

RBI Circular No. / DCBR.BPD/(PCB)M.C. No. 6/13.01.2015-16 dated-1st July 2015 नुसार काही बाबी नव्याने सदर पॉलीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:-

१) बचत ठेव / चालू ठेव खाते उघडून घेताना जुन्या खातेदाराच्या स्वाक्षरी / ओळखीची खाते उघडण्याच्या फॉर्मवर आवश्यकता नाही. PML Act & Rules नुसार ते बंधनकारक देखील नाही. मात्र केवायसी पॉलीसी नुसार सदरील खातेदाराची संपूर्ण केवायसी कागदपत्रे दप्तरी घेणे आवश्यक आहे.

२) अज्ञाच्या नावे खाते उघडून घेताना, त्याचे वय विचारात न घेता, खाते उघडणे व त्यावर व्यवहार करणे हे अधिकार केवळ अज्ञान खातेदाराच्या नैसर्गिक पालकांना अथवा कायदेशीर पालकांनाच प्राप्त होईल. तसेच एटीएम / डेबिटकार्ड, नेटबँकिंग, चेकबुक, इ सुविधा कायदेशीर पालक हे अज्ञानाच्या वतीने घेऊ शकतात. मात्र बँकेच्या खातेव्यवहारासाठी खातेदारच्या नैसर्गिक अथवा कायदेशीर पालकांच्या स्वाक्षरीची आवश्यकता नसून खातेव्यवहार अज्ञानाच्याच नावाने करता येऊ शकतात. सदरहू खाते उघडून घेताना, सदरील फोर्मवर पालकांची संमती घेणे आवश्यक आहे.

३) अज्ञान खातेदाराने त्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण केल्या नंतर त्याचे सदरील खाते बंद करून बचत ठेव खाते उघडून घेणे आवश्यक आहे.त्याचवेळी जुन्या खात्यामधील शिलकीबाबतचे कन्फर्मेशन बँकेकडे सादर करणे आवश्यक राहील. त्याचवेळी त्याने संपूर्ण केवायसी कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.

४) नामनिर्देशन सुविधा बँकेने सर्व ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना यासाठी त्याची माहिती देण्यात येऊन नामनिर्देशन करण्यासाठी आग्रह करण्यात यावा. ग्राहकास नामनिर्देशन करावयाचे नसल्यास तसा उल्लेख व स्वाक्षरी रेकॉर्डवर घ्यावी. ग्राहक त्यासदेखील तयार नसल्यास बँकेच्या अधिकृत अधिकार्याने तसे रेकॉर्डवर घ्यावे. (खाते उघडण्याच्या फॉर्म वर नमूद करावे)

५) चालू ठेव खाते उघडून घेताना, सदरील खातेदाराचे अन्य बँकेमध्ये कॅश क्रेडीट खाते नसल्याबाबतचे डिक्लेरेशन रेकॉर्डवर घेणे अनिवार्य आहे. अन्य बँकेत त्यानुसार कॅश क्रेडीट खाते असल्यास, त्या बँकेस आपल्या बँकेने उघडलेल्या खात्याची माहिती देऊन आपल्या बँकेत खाते उघडण्यासाठी “ना हरकत दाखला” घेणे जरुरी आहे.

६) बँकेने निर्धारित केलेली किमान रक्कम खात्यावर ठेवली न गेल्यास त्यापोटी किमान शिल्लक चार्जेसची आकारणी करणेत येईल.

उपरोक्त बाबींशिवाय बँकेने ठेव संकलन करणेसाठी शाखांना दैनंदिन कामकाजाचे माध्यमातून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक नियामवली ठरवून दिलेली आहे.

१) कोणत्याही प्रकारातील ठेव स्वीकारताना ग्राहकाकडून केवायसी पॉलीसीनुसार प्रथम KYC पूर्तता करून घेणे अनिवार्य आहे.

२) लो कॉस्ट ठेवी / CASA DEPOSIT वाढविण्याचे बँकेचे धोरण असून, तदनुषंगिक ग्राहकसंख्या व छोटे ठेवीदार यांची संख्या वाढवण्यावरही भर देणे आवश्यक आहे.

३) विविध मदुतीत ठेव स्वीकारताना बँकेने त्या त्या योजनेसाठी ठरवलेल्या नियमांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

४) नविन व्यक्तिगत स्वरुपात मोठया रकमेच्या ठेवी (Bulk Deposit) स्वीकारताना Prevention of Money Laundering Act मधील तरतुदींनुसार Sources of Funds ची योग्य ती खातरजमा करणे आवश्यक आहे.

५) दि. २७ नोव्हेंबर २०१७ रोजिच्या मा. संचालक मंडळ सो मान्यतेनुसार ०१ जानेवारी २०१८ पासनू बँकेमधील विद्यमान ठेवींचे हे कायमस्वरूपी नूतनीकरण करण्यात येणार आहे. (आयकर सवलतीकरता ठेवीदाराने ठेवलेल्या ठेवींव्यतिरीक्त).

६) दि. ०१ जानेवारी २०१८ पूर्वीच्या अथवा विशेष योजनेअंतर्गत र्जाहीर केलेल्या ठेव योजनांमधील / मुदत संपलेल्या ठेवींना वर्ग झालेल्या ठेवींचे मुदत संपल्यानंतर किमान १४ दिवसांचे कालावधीत नतुनीकरण केल्यास मुदत संपलेल्या दिनांकापासून नूतनीकरण होईल. सदर १४ दिवसांचे कालावधीनंतर नूतनीकरण मूळ मुदत संपल्याच्या दिनांकापासून करावयाचे झाल्यास, त्यावर सेव्हिंग्स ठेव दराने व्याज दिले जाईल. ठेवींचे उपरोक्त कालावधीनंतर नूतनीकरण केल्यास त्याची विलंबाची कारणे विचारात घेऊन सेव्हिंग्स ठेव व्याजदरापेक्षा अधिक दराने व्याज देणेबाबतचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतील. मुदत ठेव पावती ऑटो – नूतनीकृत झालेली असेल व सबंधित खातेदारास सदर ठेव पावती नूतनीकरण करावयाची नसल्यास अश्यावेळी ठेव पावती नूतनीकरण झाल्यापासून ०७ दिवसांचे आत खातेदाराने मागणी केल्यास Before Maturity Application घेऊ नये तसेच व्याज आकारणी करू नये व मुदत ठेव पावतीचे Auto Renewal होते वेळी असलेली Maturity रक्कम (TDS वजा जाता) अदा करावी. ०७ ते १४ दिवसांचे कालावधीत अश्या प्रकारची मागणी झाल्यास Before Maturity Application घेऊन दंडव्याज आकारणी न करता नियमानुसार व्याज आकारावे. तसेच १४ दिवसानंतर अश्या प्रकारची मागणी आल्यास Before Maturity Application घेऊन प्रचलित पद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी.

७) ७ ते १८० दिवस या कालावधीतील प्रस्तावीत व्याजदरानुसार स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्व बंद करताना दंड व्याज आकारण्यात येऊ नये. (उदा. १८० दिवसांसाठी ठेव ठेवली आणी ५० व्या दिवशी मुदतपूर्व बंद केल्यास त्यास संबंधित कालावधीस असलेल्या दराने व्याज अदा करावे. तसेच ९५ व्या दिवशी मुदतपूर्व बंद  केल्यास त्या कालावधीसाठी असलेल्या दराने व्याज अदा करावे).

८) १८१ दिवसापासून पुढील  कालावधीकरता ठेवलेल्या ठेवी कोणत्याही कारणास्तव मुदतपूर्व बंद  केल्यास प्रचलीत नियमानुसार १% दंड व्याज सर्वांसाठी लागू राहील.

९)शिकाऊ, प्रोबेशनरी अथवा करारावर असलेले सेवकांचे विनंतीनुसार त्यांच्या बँकेच्या सेवा कालावधीतच त्यांच्या मुदत ठेवीस १% जादा व्याजदराची सवलत उपलब्ध राहील, परंतू शिकाऊ, प्रोबेशनरी व करारावर घेतलेल्या सेवकांचा सेवाकाल कोणत्याही कारणास्तव (कराराचा कालावधी पूर्ण झाल्याने अथवा कराराचे कालावधीपूर्वी) संपूष्टुात आल्यास अथवा त्याची सेवा काही कारणास्तव खंडीत (बडतर्फ) केल्यास अशा सेवकांना त्यांच्या सेवा कालावधीत उपलब्ध असणारी जादा व्याजदराची सवलत  त्यांच्या सेवा कालावधी पश्चात उपलब्ध राहणार नाही. अशा शिकाऊ,प्रोबेशनरी अथवा करारावर असलेले सेवाकांना त्यांच्या सध्या चालू असलेल्या मुदत ठेवींचा कालावधी पूर्ण होईपर्यन्तच सदरचा १% जादा व्याजदर लागू राहील. त्यानंतर होणाऱ्या नूतनीकरणास व नवीन ठेवींना सदरच्या १% जादा व्याजदराची सवलत उपलब्ध राहणार नाही.

१०) जे सेवक त्यांचा नियमीत सेवा कार्यकाल (विद्यमान नियमानुसार वयाची ५५ किंवा ५८ वर्षे) पूर्ण करून बँकेच्या नियमानुसार सेवानिवृत्त (Retired) झाले आहेत असे निवृत्त सेवक जादा १% व्याजदर मिळण्यास पात्र राहतील. म्हणजेच कोणत्याही कारणास्तव हा निकर्ष पूर्ण करणाऱ्या सेवकांना सदर सवलत उपलब्ध राहणार नाही. तसेच जे सेवक त्यांचे वय वर्षे ५५ ते ५८ या ३ वर्षांमध्ये १ किंवा २ सेवानिवृत्ती मुदतवाढ घेवून सेवानिवृत्त झालेले सेवक तसेच ज्या सेवकांनी बँकेच्या सेवेचा राजीनामा देवून ते सेवेतून मुक्त झालेले आहेत व त्यापैकी ज्या सेवकांची बँकेत किमान २० वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे अशा सेवकांना सदर १% जादा व्याजदर सवलत चालू राहील.

११) सेवकांची सोसायटी / वेल्फेअर असोसिएशन यांनाही सेवकांसाठी देण्यात येत असलेला १% जादा व्याजदर लागू राहील.

१२) वरील मद्दुा क्र.६, ७ आणी ८ मध्ये नमूद केलेल्या सर्वसाधारण नियमात सवलत मान्य करण्याचे, तसेच रक्कम रु.१५ लाखावरील (Bulk Deposit) एकरकमी ठेवींसाठी अतिरीक्त व्याजदर मान्य करण्याचे अधिकार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहतील.

१३) बँकेच्या कायम सेवेतून निवृत्त झालेल्या माजी सेवकांना तसेच ज्येष्ठ नागरीक (वयोमर्यादा ६० वर्षे पूर्ण) असलेल्या बँकेच्या सेवेतून निवृत्त सेवंकाना ज्येष्ठ नागरीक व सेवक यांना देत असलेला व्याजदर अशा दोन्ही व्याजदर सवलतींचा एकत्रित विचार करुन सर्वसाधारण ठेवींना लागू असलेल्या व्याजदरापेक्षा जास्तीतजास्त १.५०% जादा व्याजदर देता येऊ शकेल असा नियम आहे. अर्थात काही वेळी तो तत्कालीन ठेव व्याजदराना अनुसरून त्यापेक्षा कमीही असू शकेल याची नोंद घ्यावी . सदर नियमात वेळोवेळी सवलत / बदल मान्य करण्याचे अधिकार मा. संचालक मंडळास राहतील.

१४) बँकेच्या मयत (आजी / माजी) सेवकांचे पती अथवा पत्नी यांना सेवकांसाठी देण्यात येत असलेला १% जादा व्याजदर देण्यात येईल. मात्र अशा ठेवींसाठी जादा व्याजदर देताना संबंधिताकडून (मयत सेवकाचे पती अथवा पत्नी ) सदरची रक्कम ही मयत सेवकाचीच असल्याबाबत लेखी पत्र रेकॉर्डवर घेण्यात यावे.

१५) कोणत्याही व्यक्तीस वा संस्थेस ( उदा.ज्येष्ठ नागरीक,आजी/माजी सेवक ) एकाच वेळी दोन व्याज दरांचा फायदा घेता येणार नाही. ( अपवाद नियम क्र.१३ )

१६) सर्वप्रकारच्या ठेवींवरील व्याजासाठी आयकर कायद्यानुसार आयकर कपात लागू राहील.

१७) बँकेत वेळोवेळी नव्याने ठेवण्यात येणा-या वा नूतनीकरण करण्यात येणा-या ठेवींना त्यावेळचे प्रचलीत व्याजदर लागू राहतील.

१८) व्याजदर वाढीचा फायदा घेण्यासाठी जे ठेवीदार आपल्या मुदत ठेवी मूदतपूर्व बंद करून पुन्हा  ठेवींमध्ये रक्कम गुंतवतील त्यांना मुदतपूर्व ठेव बंदसाठी, मदुत ठेवीच्या झालेल्या कालावधीसाठी लागू असलेल्या ( ठेव ठेवते वेळीचा ) व्याजदरानसुार ( applicable rate ) किंवा मूळ ठेवीचा व्याजदर (Contractual Rate) यापेक्षा कमीत कमी दराने व्याज आकारणी करण्यात येईल. मात्र पुन्हा गुंतवणूक करण्यात येणारा ठेव कालावधी हा विद्यमान ठेवीच्या (मुदतपूर्व बंद होणा-या) उर्वरित कालावधीपेक्षा जास्त असेल अशावेळीसच मुदतपूर्व बंद करणेसाठीचे दंड व्याज आकारण्यात येऊ नये.

१९) संयुक्त खात्यातील एक व्यक्ती ज्येष्ठ असल्यास व त्यांनी ज्येष्ठ नागरीकांना देण्यात येणारा व्याजदर देण्याची मागणी केलेली असल्यास अशा ठेवींना त्यानुसार व्याजदर देणेत येईल.

२०) सेवकांसाठी लागू असलेल्या जादा व्याजदराचा फायदा घेणेसाठी संयुक्त नावाने असलेल्या ठेवींमध्ये सेवकाचे नाव कोणत्याही क्रमाने असले तरी त्यास सदर सवलत द्यावी. मात्र त्यामध्ये सेवक आणि सेवकाचे कुटुंबीय (पती / पत्नी, मूलगा, मुलगी व आई वडील) यांचाच केवळ समावेश असावा. मात्र संबंधित सेवकांकडून (आजी/माजी सेवक, ज्येष्ठ नागरीक (वयोमर्यादा ६० वर्षे पूर्ण असलेले निवृत्त सेवक ) सदरची ठेव रक्कम ही सेवकाची स्वतःची / मालकीची असल्याबाबत लेखीपत्र रेकॉर्डवर घेण्यात यावे.

२१) मयत ठेवीदारांच्या संदर्भातील प्रकरणे बँकेच्या विधी विभागाने निश्चित केलेल्या अद्ययावत कार्यपद्धतीनुसार करावयाची आहेत.

२२) बँकेचे आयकर बचत मुदत ठेव योजने अन्तर्गत ठेवी मासिक आणी तिमाही व्याज ठेव या प्रकारात ग्राहकांकडून स्विकारणे आवश्यक आहे.

२३) बँकेने किमान शिल्लक रकमेवर प्रचलित नियमानुसार Minimum Balance Charges आकारणी करणे. (सदर चार्जेस बाबतची माहिती बँकेच्या वेबसाईट वर तसेच शाखेत दर्शनीय भागात प्रदर्शित करण्यात येईल).

२४) खाते Inoperative / dormant करणेपूर्वी त्याबाबतची पूर्वसुचना किमान ३ महिने आधी संबंधीत खातेदारास देणे आवश्यक राहिल.

२५) खाते Inoperative / dormant झाल्यामुळे त्यापोटी बँक कोणतेही चार्जेस आकारणार नाही मात्र सदर खाते पुन्हा Operative करणेसाठी संबंधित खातेदारास अद्ययावत के.वाय.सी. सादर करणे क्रमप्राप्त राहिल.

२६) सही असणा-या खातेदारांसाठी नॉमिनीचे नाव खात्यास रजिस्टर्ड करणेसाठी साक्षीदारांची आवश्यकता नाही. मात्र अंगठा असणा-या खातेदारांसाठी दोन साक्षीदारांची आवश्यकता आहे.

२७) बचत ठेव खाते हे बँकेतील ग्राहकाचे मुलभूत  खाते ( BASE ACCOUNT ) म्हणून गृहीत धरण्यात यावे. त्यामुळे उपरोक्त खात्याची माहिती (उदा. नाव, पत्ता, फोन नं., वय, नोकरीतील बदल, मृत्यू इ.) सतत अद्ययावत करून सिस्टीममध्ये आवश्यक ते बदल वेळोवेळी करावे.

२८) बँकेमधील सध्या अस्तीत्वात असलेली शून्य जमाबाकीची खाती (No Frill Accounts) रिझर्व्ह बँकेच्या परीपत्रकानसुार Basic Savings Bank Deposit Account (BSBDA) खात्यामध्ये वर्ग करून घेणे बंधनकारक केले आहे.

२९) बँक पुढील प्रकारची खाती उघडून घेणार नाही.

१) शासकीय विभागांची खाती

२) महानगरपालिका / म्युनसिपल कमेटी /पंचायत समिती / स्टेट हौसिंग बोर्ड/ पाठ्यपुस्तक महामंडळ / मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट ऑथोरीटी  / राज्य अथवा जिल्हास्तरीय हौसिंग को ऑप.सोसा. / राजकीय पक्ष

३) नोंदणीकृत न झालेल्या संस्था / कंपनी

३०) बँकेने वेळोवेळी जाहीर केलेल्या ठेव योजना या सदर योजनेचे उद्दीष्ट पूर्ण झाल्यावर ठराविक काळानंतर बंद करण्यात येतात. तसेच काही योजना तत्कालिक आवश्यकतेनसुार जाहीर केलेल्या असतात. अशा मुदत संपलेल्या ठेवींबाबत शाखेकडून / डेटा सेंटरकडून नियोजन विभागाकडे पूर्व मान्यता मिळणेसाठी पाठपुरावा केला जातो. त्यामधे बंद झालेल्या ठेव योजनांच्या Account master मध्ये नाव वाढवणे, कमी करणे अथवा कोणताही बदल करणेसाठी शाखाव्यवस्थापक यांचे अधिकारानूसार डेटा सेंटरमार्फत करून घ्यावे. त्यासाठी नियोजन विभागाच्या पूर्वमान्यतेची आवश्यकता नाही.

३१) ठेवींवरील व्याज आयकरपात्र झाल्याने कॉम्प्यूटर सिस्टीममधून उदगम करकपात ( टी.डी.एस. ) होते. खातेदाराने सादर केलेल्या आयकर फॉर्म क्र.१५ जि / एच नूसार कपात लागू होत नसल्याने अशा रकमा ( संबंधीत ) ठेवीदारास त्याचे ठेव खाती अथवा सेव्हिंग्स खाती परत जमा देणे साठी नियोजन विभागाच्या पूर्वमान्यतेची आवश्यकता नाही. तरी शाखांनी सदर कामकाज शाखास्तरावर व डेटा सेंटरमार्फत करून घ्यावे.

३२) नवीन ठेव योजना सुरु करणे अथवा बंद करणे, वेळोवेळी त्यात बदल करणे, त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर निर्णय सर्व शाखांना कळवणे, व्याजदरात, सेवाशुल्कात बदल करणे इ. कामकाज ठेवींच्या संदर्भात नियोजन विभागामार्फत केले जाईल. तसेच बँकेच्या विविध ठेवयोजनांची माहितीपत्रके, Flex / Banners इ.माध्यमातून प्रसिद्धीचे कामकाज जाहीरात विभागामार्फत केले जाईल.

३३) बँकेतील ठेवीदारांसाठी प्रती खातेदार पाच लाखापर्यतचे ठेव रकमेस विमासंरक्षण (D.I.C.G.C.) देण्यात येते. शाखेत याची योग्य ती प्रसिद्धी करावी.

३४) सदर पॉलिसीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँक व्यवस्थापनाने राखून ठेवलेला आहे.

Customer Complaint
Customer Complaint

Thank You!

No, thank you. I do not want.
100% secure your website.
Powered by